नाशिक

नाशिक रोड

CD
मेनजवळ स्वतंत्र लावणे 16963 नाशिक रोड : वीज भवनसमोर स्मार्ट, प्रीपेड मीटरविरोधात आंदोलन माकपचे ॲड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, एकनाथ इंगळे, मोहन जाधव आदी. स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात माकप आक्रमक; वीजभवनसमोर आंदोलन नाशिक रोड, ता. २३ : महावितरणकडून विनापरवानगी आणि बेकायदेशीरपणे स्मार्ट तसेच प्रीपेड मीटर बसविण्याचा आरोप करत भारताचा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक रोड येथील वीज भवनसमोर मंगळवारी (ता.२३) निदर्शने करण्यात आली. मुख्य अभियंत्यांना यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महावितरणकडून नाशिक शहरातील अनेक भागांत ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट व प्रीपेड मीटर बसविण्यात आले असून ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे. स्मार्ट मीटर सक्तीबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नसताना आणि विद्यमान मीटर सुस्थितीत असतानाही नवीन मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात अवाजवी वाढ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत असून, प्रीपेड प्रणालीमुळे ग्राहकांवर अन्याय होण्याची शक्यता वाढल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी विनापरवानगी मीटर बसविण्यात आले आहेत ते काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. ॲड. तानाजी जायभावे, दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, एकनाथ इंगळे, मोहन जाधव, सतीश खैरनार, दीपक कोर, हिरामण तलोरे, राहुल गायकवाड आदींसह सदस्य आंदोलनात सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT