16965
पळसे : एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष ग्रामसभा प्रसंगी उपस्थित महिला.
एकल महिला सक्षमीकरणासाठी
पळसेत विशेष ग्रामसभा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २३ : पळसे ग्रामपंचायतीच्या वतीने एकल महिला दिनानिमित्त गावातील एकल महिलांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी, शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तसेच त्यांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी सोनाली पगारे यांनी महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित महिलांच्या समस्या ऐकून त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिजाबाई बोंबले आणि रुपाली सरोदे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी स्वयंरोजगार, बचत गट, आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन, घरकुल, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना तसेच महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील एकल, महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन सोनाली पगारे यांनी दिले.
ग्रामसभेला सरपंच शोभाताई गायधनी, ग्रामपंचायत अधिकारी सोनाली पगारे, आरोग्य अधिकारी डॉ. किरण गायकवाड, स्मिता गोवर्धने, आरोग्य सेविका तेजस्विनी खडसे, प्रांजल गायधनी, इंदुमती रोडे, सरला कारे, भारती गायधनी, अनिता शिंदे, अर्चना रत्नपारखी, उषा तुपे, आरती गायखे, रोहिणी ढेरिंगे, वैशाली पगार, शिला गायधनी यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.