नाशिक

देवळाली गावात पत्र्याच्या शेडमधून ३२ हजारांचा गांजा जप्त; संशयित अटकेत

CD
देवळालीगावातून ३२ हजारांचा गांजा जप्त नाशिक रोड, ता. २६ : देवळालीगावातील सोमवार बाजार परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका संशयिताला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्या ताब्यातून ३२ हजार ४६० रुपये किमतीचा गांजा आणि मोबाईलसह एकूण ४३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिपाई कुणाल दत्तात्रय घोरपडे यांना संशयित सागर संभाजी सकट (वय २७) हा विक्रीसाठी गांजा लपवून ठेवत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. झडतीदरम्यान गांजा आढळून आला. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, प्लॅस्टिक पिशव्या आणि मोबाईलही जप्त करण्यात आला. चौकशीत संशयित सागर सकट याने हा गांजा त्याची आई मंगला सकट हिने भावड्या नावाच्या व्यक्तीकडून आणून दिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सागर सकट व अन्य संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पथकाचे सहायक निरीक्षक विशाल पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT