भरधाव पिकअपच्या धडकेत
महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
सैन्यदलातील जवान मित्राची प्रकृती चिंताजनक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. ५ : मित्रांसोबत सिनेमा पाहून मध्यरात्री घरी परतणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाच्या बुलेटला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पियुष विलास मोरे (२१, रा. सत्यम पार्क, जाचकनगर, जयभवानी रोड, नाशिक रोड) याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला सैन्यदलातील जवान अनुराग दुबे जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पियुष व अनुराग हे मित्रांसह सिटी सेंटर मॉलमध्ये सिनेमा पाहून मध्यरात्री घरी परतत होते. पुणे रोडवरील फेम सिनेमाजवळील शिवाजीनगर परिसरात पॉल ढाब्यासमोरून जात असताना नाशिक रोडकडून आलेल्या भरधाव पिकअपने तपोवन रोडकडे वळताना बुलेटला जोरदार धडक दिली. धडकेनंतर पिकअप चालक वाहनासह पसार झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या पियुषला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अनुरागला पुढील उपचारांसाठी पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
पियुष द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. उपनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार संदीप हिवाळे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.