नाशिक

नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद

CD
मेन फोटो : B17600 नाशिक रोड : बसस्थानकांवर सुरू झालेले काम --- नाशिक रोड बसस्थानक तीन महिन्यांसाठी बंद रखडलेल्या काँक्रिटीकरणाला मुहूर्त; पर्यायी ठिकाणांहून बससेवा सुरू सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. ९ : नाशिक रोड बसस्थानकाच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला अखेर बुधवारी (ता. ९) सुरुवात झाली. बसस्थानकाच्या संपूर्ण आवारात काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याने पुढील तीन महिने बसस्थानक बंद राहणार आहे. या कालावधीत एसटी बससेवेचे नियोजन उड्डाणपुलाखालील जागेसह नाशिक रोड पोलिस ठाण्याजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या नियंत्रण कक्षातून करण्यात आले आहे. नाशिक रोड बसस्थानक हे शहरातील महत्त्वाचे बसस्थानक असून, लगतच रेल्वेस्थानक असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. राज्यातील विविध भागांत जाणाऱ्या एसटी बस तसेच शहर बससेवाही याच परिसरातून सुरू असते. त्यामुळे बसस्थानकाच्या आवारावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण येत असल्याने परिसराची दुरवस्था झाली होती. संपूर्ण आवारात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवासी व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. बसस्थानकाचे काँक्रिटीकरण अथवा डांबरीकरण करण्याची मागणी प्रवासी, नागरिक तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. तक्रारींची दखल घेत प्रशासनाने गेल्या वर्षी काँक्रीटीकरणासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब झाला. अखेर बुधवारी कामाचा श्रीगणेशा झाला असून, काम सुरू करण्यापूर्वी बसस्थानक परिसरातील आवश्यक सुविधा व अडथळे हटविण्यात आले आहेत. काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत बसस्थानक बंद राहणार असल्याने बस पर्यायी ठिकाणांहून सोडण्यात येत आहेत. नाशिक रोड पोलिस ठाण्याजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या बसथांब्यावरून पुणे, सिन्नर, संगमनेर यासह अन्य मार्गांवरील बसेस थांबण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तात्पुरत्या बसथांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. प्रवाशांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असून, या व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. --चौकट वाहतूक व्यवस्थेची पाहणी तात्पुरत्या बसथांब्यावरील वाहतुकीची परिस्थिती पाहण्यासाठी नाशिक रोड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे आणि नाशिक रोड बसस्थानकाचे प्रमुख नितीन जगताप यांनी बुधवारी भेट देऊन पाहणी केली. काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना प्रवाशांची गैरसोय आणि वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी पर्यायी बसथांब्यावरील वाहतूक व्यवस्थेचे अधिक प्रभावी नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. एसटी महामंडळाने प्रवाशांनी पर्यायी बसथांब्यांची माहिती घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि काँक्रिटीकरणाच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT