नाशिक

मराठा आरक्षणासाठी मतभेद विसरून एकजूट व्हा

CD
फोटो CHE26B17685 नाशिक रोड : मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंब्यासाठी आयोजित बैठकीप्रसंगी शिवाजी सहाणे, दत्ता गायकवाड, विकास भागवत, शिवाजी हांडोरे, रामभाऊ जगताप आदी. मराठा आरक्षणासाठी मतभेद विसरून एकजूट व्हा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा; गावागावांत बैठका घेण्याचा बैठकीत निर्णय सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता.१६ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी गर्व, अहंकार आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आले. सकल मराठा समाजातर्फे आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बुधवारी (ता. १६) कदम लॉन्स येथे बैठक घेण्यात आली. या वेळी शिवाजी सहाणे यांनी मार्गदर्शन केले. सरकारकडून देण्यात येणारे आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत टिकण्यासाठी अभ्यासक आणि विधी तज्ज्ञांचे पथक तयार करण्याच्या दृष्टीने समाजाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांनी जरांगे पाटील समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी प्रयत्न करीत असल्याने समाजबांधवांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. सुलोचना भोसले यांनी आरक्षणाचा प्रश्न समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत समाजबांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. विकास भागवत यांनी समाजाची एकजूट कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सांगितले. बैठकीत प्रत्येक गावात समाजाच्या बैठका घेऊन संघटन मजबूत करणे, जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात महसूल आयुक्तांना निवेदन देणे आणि आंदोलनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे, असे ठराव करण्यात आले. या वेळी रामभाऊ जगताप, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, दिनकर आढाव, बाळासाहेब म्हस्के, विजय जाधव, शिवाजी हांडोरे, दर्शन सोनवणे, मनोज लांडगे, बापू सापुते, राजाभाऊ फोकणे, बबलू बोराडे, राजाभाऊ मोरे, राजाभाऊ जाधव, शरद जगताप, सुदाम ताजनपुरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास भागवत यांनी सूत्रसंचालन केले.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT