नाशिक

प्रभाग बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

CD
पान दोन ------------ CHE26B17752 नाशिक रोड : प्रभाग समितीच्या बैढकीत वृक्षतोडीवर फलक फडकून बोलताना नगरसेविका सीमा ताजणे. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर नाशिक रोड प्रभाग बैठक; वृक्षतोड, पाणीपुरवठा, मोकाट कुत्रे, खड्ड्यांबाबत विचारला जाब सकाळ वृत्तसेवा नाशिक रोड, ता. २२ : नाशिक रोड प्रभाग समितीच्या बैठकीत नागरी समस्यांवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिजामाता व्यायामशाळेतील वृक्षतोड, अनियमित व गढूळ पाणीपुरवठा, मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, रस्त्यावरील रेती, उड्डाणपुलावरील खड्डे, विभागीय अधिकाऱ्यांची बदली, अतिक्रमणे आणि सार्वजनिक शौचालयातील वीज वापराच्या मुद्द्यांवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. विविध प्रश्नांवर विद्युत व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परस्परांवर जबाबदारी ढकलली जात असल्याने लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाशिक रोड विभागीय कार्यालयात प्रभाग समितीची बैठक सभापती रमेश धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत नगरसेविका सीमा ताजणे यांनी जिजामाता व्यायामशाळेतील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयीन आदेशाची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप केला. ''सर्रास छाटली गेली वृक्षवल्ली'' असा फलक सभागृहात दाखवत त्यांनी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली. न्यायालयाचे आदेश असतानाही झाडे कोणी तोडली आणि त्यांच्यावर काय कारवाई केली ? असा सवाल करत कारवाई न झाल्यास हा मुद्दा न्यायालयात नेण्याचा इशारा दिला. नगरसेवक कैलास मुदलियार यांनी सार्वजनिक शौचालयातील वीज मीटरचा वापर इतर व्यावसायिक करत असल्याचा आरोप केला. महापालिका हे बिल भरत असल्याने याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच अंदाजे दिलेली पाणी बिले दुरुस्त करण्याची मागणी केली. नगरसेविका वैशाली दाणी यांनी प्रभागातील गढूळ पाणी आणि सौभाग्यनगर रस्त्यावर पसरलेल्या रेतीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचा मुद्दा मांडला. बैठकीस नगरसचिव संजय नेरकर, नगरसेवक शरद मोरे, केशव पोरजे, योगेश गाडेकर, सतीश निकम, कोमल मेहरोलिया, संजीवनी हंडोरे, सुनीता भोजने, जयश्री गायकवाड आदी उपस्थित होते. ---------- गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश बैठकीला अधिकारी अनुपस्थित राहत असल्याबद्दल नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या वेतनातून दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली. यावर सभापती रमेश धोंगडे यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना ''कारणे दाखवा'' नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. शैलेश ढगे यांनी प्रभाग बैठकीच्या आदल्या दिवशी विभागीय अधिकाऱ्यांनी पूर्वबैठक घेण्याची सूचना केली. ----- उड्डाणपुलावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष मागील बैठकीत मुद्दा उपस्थित करूनही उड्डाणपुलावरील खड्डे महिनाभर उलटूनही बुजविले गेले नाहीत, तसेच मुक्तिधाम परिसरातील अतिक्रमणे हटवली नाहीत, याबद्दल नगरसेवकांनी जाब विचारला. नगरसेविका भारती ताजनपुरे, रुचिका साळवे व योगेश भोर यांनी ग्रामीण भागातील नागरी कामांकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Medal Table: भारतीय महिलांच्या 'Gold' ने पदकतालिकेत उलथापालथ, १२ व्या स्थानावर असलेलो आपण थेट पोहोचलो...

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Numerology: लहान मुलांचा हट्टीपणा अन् जन्म तारीख; 'या' ३ मूलांकांची मुले असतात प्रचंड हट्टी! पाहा काय सांगते अंकशास्त्र...

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

SCROLL FOR NEXT