नाशिक

चांदवडला शिवसेना नगरसेवकाला मारहाण;अंडरपास मुद्यावरून वादंग

CD
अंडरपासच्या मागणीवरून वाद; नगरसेवकाची मारहाणीची तक्रार पाणी साचणे, वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून चांदवडमध्ये नवा वाद सकाळ वृत्तसेवा गणूर, ता. २४ : चांदवड शहरातील पावसाळी पाणी निचरा, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित असलेल्या प्रस्तावित अंडरपासच्या मागणीवरून शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक सुधीर सुनील कबाडे यांनी सचिन दत्तात्रय राऊत यांच्याविरोधात मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार चांदवड पोलिस ठाण्यात दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे. २२ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसानंतर हायवे रोडवरील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. डोंगर भाग व गणेश कॉलनी परिसरातून आलेले पाणी रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात घुसल्याने काही दुकानांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि व्यापाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती. हॉटेल परिसरातील पार्किंगमुळे होणारी गैरसोय, पावसाळ्यातील पाणी साठा आणि वाढती वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून संबंधित ठिकाणी अंडरपास उभारण्याची मागणी होत आहे. नेमीनाथ कॉलेज परिसरातील अंडरपासच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविल्यास वाहतुकीला दिलासा मिळेल तसेच पाणी साचण्याचा प्रश्नही कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे. या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व नगरपरिषद स्तरावर गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रस्तावित अंडरपासला विरोध होत असल्याचेही समोर आले आहे. २३ जून रोजी या विषयावर चर्चा सुरू असताना वाद निर्माण झाला. यावेळी सचिन राऊत यांनी शर्टची कॉलर पकडून मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप नगरसेवक कबाडे यांनी तक्रारीत केला आहे. चौकट अंडरपासचा प्रश्न पुन्हा चर्चेत चांदवड शहरातील हायवे परिसरात पावसाळ्यात पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. अलीकडील वादानंतर प्रस्तावित अंडरपासची मागणी पुन्हा जोर धरू लागली असून, प्रशासन व संबंधित यंत्रणा याबाबत कोणता निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT