नाशिक

मालेगाव–नाशिक एस.टी. बसेस बायपासने; प्रवाशांची गैरसोय

CD
मालेगाव-नाशिक एसटी बस बायपासने; चांदवड भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय सकाळ वृत्तसेवा गणूर (चांदवड), ता. २ : मालेगाव-नाशिक मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या काही बस निर्धारित बसस्थानकात न थांबता बायपास मार्गाने जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकाराची तक्रार कवी विष्णू थोरे यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे. मालेगाव-नाशिक मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसस्थानकात बसची प्रतीक्षा करावी लागते. मात्र काही बस बायपासने पुढे जात असल्याने प्रवाशांना बससेवेपासून वंचित राहावे लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतो. अनेकदा बायपासवर जाऊन बस पकडावी लागत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याचे थोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. एसटी महामंडळाची बससेवा ही सर्वसामान्यांच्या दळणवळणाचा प्रमुख आधार असताना निर्धारित बसस्थानकात न येता बस बायपासने का जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही पुरेसे लक्ष दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालेगाव-नाशिक मार्गावरील बसफेऱ्यांची तातडीने चौकशी करून बस बायपासने जाण्यामागचे कारण स्पष्ट करावे. सर्व संबंधित एसटी बस निर्धारित बसस्थानकात येऊन प्रवाशांना सेवा देतील, याबाबत संबंधितांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी थोरे यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

SBI ATM Rule: 1 ऑक्टोबरपासून ATMच्या नियमांत मोठा बदल! नियम समजून घ्या, नाहीतर भरावा लागेल चार्ज

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

गणेशोत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग, निकृष्ट कामावर उपमहापौरांचा दणका; सॅम्पल तपासणीचे निर्देश, बिल न काढण्याची सूचना

Mumbai-Goa Highway : पुढील 6 महिन्यांत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होणार! गणेशोत्सवाआधी 'हा' महत्त्वाचा पूल प्रवाशांच्या सेवेत; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT