नाशिक

…आता सौर पॅनलवर चोरट्यांचा डोळा!

CD
सौर कृषी पंपाचे पॅनल चोरट्यांच्या निशाण्यावर रायपूर शिवारात नऊ पॅनल चोरीला; शेतकऱ्यात चिंता सकाळ वृत्तसेवा गणूर (चांदवड), ता. ५ : रात्री शेतात पिकांना पाणी देताना सर्पदंश, वन्यप्राण्यांचे हल्ले आणि कडाक्याच्या थंडीपासून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, तसेच वीजबिलाचा खर्च कमी व्हावा, यासाठी शासनाने सौर कृषी पंप योजना सुरू केली. मात्र, आता या योजनेअंतर्गत शेतात बसविण्यात आलेल्या सौर पॅनलवरही चोरट्यांची नजर पडली आहे. चांदवड तालुक्यातील रायपूर शिवारात सौर कृषी पंपाचे नऊ पॅनल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी (महाऊर्जा) अंतर्गत सौर कृषी पंप योजनेतून हे पॅनल शेतात बसविण्यात आले होते. रायपूर येथील शेतकरी संदीप सोपान जेऊघाले यांच्या शेतगट क्रमांक १७५/०३ मधील पॅनल २ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात ते ३ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान चोरीला गेले. याप्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटर, स्टार्टरनंतर सौर पॅनल शेतातील विहिरींच्या मोटारी, स्टार्टर चोरीला जाण्याच्या घटना यापूर्वी घडत होत्या. आता चोरट्यांनी सौर पॅनलसारख्या मोठ्या वस्तूंकडेही मोर्चा वळवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांना पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा वेळी सौर कृषी पंपाचे पॅनल चोरीला गेल्याने संबंधित शेतकऱ्याच्या पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पॅनल चोरीनंतर चोरट्यांचा शोध आणि पोलिसांचा तपास सुरू राहील; मात्र शेतकऱ्याचा हंगाम थांबणार नाही. त्यामुळे सौर पॅनल चोरीच्या घटनांना आळा घालण्याबरोबरच चोरी झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Spy Camera Allegation : पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमचा आरोप, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; सुप्रिया सुळेंच्या आरोपाने खळबळ

दिवाळीला सुट्टी मागताना काळजी घ्या! WhatsApp वर बॉसचा OK मेसेज म्हणजे रजा मंजूर नव्हे; कर्मचाऱ्याची याचिका फेटाळली, प्रकरण काय?

Jarange Audio Clip: ''500 कोटींचं सोडा.. जरांगे पाटलांच्या विरोधात नेमकं चाललंय काय?'', राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, जवळची माणसं फोडून...

Marathi News Live Updates:मुलुंडमध्ये पुलाचे काम चार वर्षांपासून रखडले; काँग्रेसकडून पाहणी

Vastu Tips: दिवाळीपूर्वी घरात रंगकाम करताय? चुकीचा रंग आणू शकतो गरिबी! घर रंगवताना नक्की पाळा वास्तूचे 'हे' नियम...

SCROLL FOR NEXT