नाशिक

चांदवड शिक्षक पतसंस्थेची भरारी; ७७ लाखांचा विक्रमी नफा

CD
चांदवड शिक्षक पतसंस्थेला ७७ लाखांचा नफा सभासदांना ८ टक्के लाभांश; २५ लाखांपर्यंत कर्जपुरवठा, १० लाखांचे विमा कवच सकाळवृत्तसेवा गणूर (चांदवड), ता. १२ : प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था, चांदवडने आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत ७७ लाख १३ हजार ४०८ रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती चेअरमन किरण गांगुर्डे यांनी दिली. रविवार (ता. १३) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना आठ टक्के लाभांश देण्यास मंजुरी घेतली जाणार आहे. नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र प्राप्त झाल्यानंतर संस्थेच्या विस्ताराला गती मिळाली आहे. स्वमालकीच्या इमारतीतून सभासदांना ८.५ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जात असून, कोणत्याही वित्तीय संस्थेकडून कर्ज न घेता केवळ सभासदांच्या ठेवींवर आधारित व्यवहार केले जात आहेत. सभासदांना २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. मृत सभासदांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची मदत, तसेच १० लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. ऑनलाइन अॅपद्वारे सभासदांना खात्याचे व्यवहार पाहता येतात. आर्थिक प्रगतीसोबत संस्थेने सामाजिक बांधिलकीही जपली आहे. गुणवंत पाल्यांना पारितोषिके देण्यासह उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व शिक्षकांचा ‘कै. देवाजीनाना गांगुर्डे शिक्षक रत्न पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. संस्थेची आर्थिक उलाढाल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, ऑडिट वर्ग ‘अ’ कायम आहे. शिक्षकरत्न पुरस्कार यंदा उपक्रमशील अधिकारी म्हणून मनोहर सूर्यवंशी, श्रीधर देवरे, निलेश पाटील, शितल तावडे, धनंजय कोळी व दिलीप नाईकवाडे यांचा गौरव होणार आहे. तसेच चंद्रकांत सूर्यवंशी, नवल चौरे, शितल कापडणीस, मेघा कुंभारकर, सुरेश पवार, साहेबराव शेवाळे, दिनेश बागूल, दिनेश पवार व निलिमा पगार या नऊ शिक्षकांची ‘शिक्षक रत्न’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

MSRTC Udgir Chaos: उदगीरच्या ४९ एसटी बसेस कोकणात; स्थानिक वाहतुकीचे तीनतेरा, प्रवाशांना बसस्थानकावर ताटकळावे लागले

Leopard Terror: मांजरी खुर्दमध्ये बिबट्याचा कहर; गोठ्यात घुसून वासराचा फडशा, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Marathi News Live Updates: पुणे-अहिल्यानगर रोडवर भीषण वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT