राजमुद्रा फ्रेंड सर्कलतर्फे
रक्तदान, आरोग्य तपासणी
गणूर (चांदवड) : सामाजिक बांधिलकी जपत राजमुद्रा फ्रेंड सर्कलतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. भूषण कासलीवाल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. शिबिरात ६२ जणांनी रक्तदान केले, तर ६७ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तदान उपक्रमासाठी सचिन धाडीवाल, जैनम जीविका फाउंडेशन, नयन जैन, कल्पना सोनवणे आणि अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. स्वाती शरणागत, वनिता आहड, नेहा कोल्हटकर, साक्षी मनगटे व केतकी दुसाने यांनी सहभाग घेतला. आरोग्य तपासणीत नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात आले. रक्तदान आणि आरोग्य तपासणीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नितीन अग्रवाल, आकाश बडोदे, मनोहर मोरे, सुनील डुंगरवाल यांच्यासह नागरिक उपस्थित होते. राजमुद्रा सर्कल गणपती मंडळाचे अध्यक्ष सम्यकजी डुंगरवाल, कार्याध्यक्ष रोनक तिलोडा, उपाध्यक्ष पार्थ श्रीश्रीमाळ, हर्षल संचेती, संस्थापक यश डुंगरवाल, रोहन तिल्लोडा, संयम अचलिया, यश लुणावत, सैनिक संचेती, यश देशमुख, नैतिक अचलिया, मित डुंगरवाल यांनी परिश्रम घेतले.
चांदवड : राजमुद्रा फ्रेंड सर्कलतर्फे रक्तदान शिबिरात सहभागी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.