CHW26B02377
चांदवड ः ताब्यात घेतलेल्या गांजासह पोलिस निरीक्षक अभिजित सोनवणे आणि इतर पोलिस.
-------------------
३६-२
चांदवड येथे महिलेकडून
गांजासह रोकड ताब्यात
-----------------
लेंडी हट्टी परिसरात सव्वा किलो गांजा हाती
सकाळ वृत्तसेवा
गणूर (चांदवड), ता.२० ः चांदवड शहरातील लेंडी हट्टी परिसरात गांजाची बेकायदा विक्री करणाऱ्या महिलेवर चांदवड पोलिसांनी शनिवारी (ता.१९) कारवाई केली. जमना समाधान माळी (३६, रा. लेंडी हट्टी, चांदवड) हिच्या घरावर टाकलेल्या छाप्यात १ किलो ४९२ ग्रॅम गांजा आणि १ लाख २२ हजार ५३ रुपये रोख असा एकूण १ लाख ५१ हजार ८९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांना या गांजाविक्रीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जमना माळी हिच्या घराची झडती घेतली. यावेळी तिच्या ताब्यातून २९ हजार ८४० रुपये किमतीचा १ किलो ४९२ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. गांजा विक्रीतून मिळाल्याचा संशय असलेली १ लाख २२ हजार ५३ रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली.
पोलिस अंमलदार प्रदीप गणपत आजगे यांच्या फिर्यादीवरून जमना माळणीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८ (क) व २० (ब) (ii) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक भानुदास नऱ्हे तपास करत आहेत.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.