नाशिक

वकिलाचे बंद घर फोडून सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

CD
वकिलाचे बंद घर फोडून दागिने लंपास --- चाळीसगावातील शिवाजीनगरातील घटना; तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २ : रक्षाबंधनानिमित्त कुटुंबीयांसह मूळ गावी गेलेल्या वकिलाच्या बंद घरातून चोरट्यांनी तब्बल दोन लाख ६२ हजार ५०० रुपयांचे, १०.५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना चाळीसगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्हीच्या वायरी कापून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही फुटेजमध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. याबाबत ॲड. नितीन सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नी शुभांगी, मुलगा अथर्व व मुलगी त्रिशा यांच्यासह २७ ऑगस्टला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रक्षाबंधनासाठी घराला कुलूप लावून मूळगावी गेले होते. ते ३० ऑगस्टला रात्री अकराला चाळीसगावातील घरी परतले. त्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घराच्या आतील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला होता. बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लांबविल्याचे आढळले. ॲड. पाटील यांनी तत्काळ घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन चोरटे कॅमेऱ्यात दिसून आले. तसेच, चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायरही कापल्याचे आढळले. हे फुटेज त्यांनी सुरक्षित ठेवले आहे. घटनेची माहिती मिळताच मित्र व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्वान पथक व ठसेतज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासासाठी पुरावे संकलित केले. याबाबत चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सीसीटीव्ही फुटेज ठरणार महत्त्वाचा धागा बंद घर असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र, घरातील सीसीटीव्ही यंत्रणेची वायर कापूनही काही फुटेजमध्ये तीन चोरटे कैद झाल्याने पोलिसांच्या तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला आहे. चोरट्यांनी घराची रेकी केली होती का, चोरीपूर्वी त्यांनी परिसराची पाहणी केली होती का, यांसह विविध शक्यतांचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या दागिन्यांची झाली चोरी चोरट्यांनी ८७ हजार ५०० रुपयांची ३५ ग्रॅमची सोन्याची मंगलपोत, एक लाख ३० हजारांचा ५२ ग्रॅमचा राणीहार, १५ हजारांची सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी, २५ हजारांचा दहा गॅमचा सोन्याचा वेढा, पाच हजारांची प्रत्येकी एक गॅमचे सोन्याची दोन बिस्किटे असा एकूण दोन लाख ६२ हजार ५०० रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ वर्षांत २४८ कोटी रुपये खर्च, मुंबईतील उड्डाणपुलावर भूकंपासारख्या भेगा; ३ महिन्यांत तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात

Manoj Jarange Patil: ‘मागण्या मान्य करा, नाहीतर उडी घेऊ’; लातूरमध्ये मराठा तरुणांचा टोकाचा इशारा

Pune News : पुणे विद्यापीठासह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’; राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

Pune News : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार; त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई

Goa Extortion Row: काँग्रेस नेत्यावर खंडणीच्या आरोपांची छाया; गोवा वसुली प्रकरणाचे मुंबई कनेक्शन, नेत्यांच्या फोटोंवरून भाजपचा गंभीर दावा

SCROLL FOR NEXT