नाशिक

संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी बंजारा समाज एकवटला

CD
NSK26H28588 चाळीसगाव ः पालिका कार्यालयावर बुधवारी काढलेल्या मोर्चात सहभागी बंजारा समाजबांधव. --- पुतळ्यासाठी बंजारा समाज एकवटला चाळीसगाव पालिकेवर धडक मोर्चा; ठिय्या आंदोलनाची दखल सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. २ ः शहरात संत सेवालाल महाराजांचे स्मारक तथा अश्वारूढ पुतळा उभारावा, या मागणीसाठी तालुक्यातील बंजारा समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने बुधवारी (ता. २) येथील पालिकेवर धडक मोर्चा काढला. शासकीय विश्रामगृहापासून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे पालिकेत पोहोचला. तेथे समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन करीत संत सेवालाल महाराजांच्या पुतळ्याची मागणी जोरदारपणे मांडली. आंदोलनात बंजारा समाजातील ज्येष्ठ मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व तरुण सहभागी झाले होते. ‘संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा’, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांनी पालिका परिसरात बंदोबस्त ठेवला होता. पालिकेकडून आश्वासन आंदोलनस्थळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांनी बंजारा समाजबांधवांशी चर्चा केली. येत्या १५ दिवसांत संत सेवालाल महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, यापूर्वीही अशी आश्वासने मिळाली असून, आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्षात पुतळा उभारला गेला पाहिजे, अशी भूमिका समाजबांधवांनी घेतली. हे शेवटचे आश्वासन आहे. आता पुतळा उभारण्यास विलंब झाल्यास समाजबांधव स्वतःच्या पैशातून संत सेवालाल महाराजांचा पुतळा उभारतील, असा इशाराही देण्यात आला. बंजारा समाजाचे नेते सुधाकर राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. अनेकांचा पाठिंबा बंजारा समाजबांधवांच्या आंदोलनाला माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह (कै.) लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे नगरसेवक, अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी, सायली जाधव, घृष्णेश्‍वर पाटील आदींनी पाठिंबा दिला. दरम्यान, पालिकेने दिलेल्या १५ दिवसांच्या आश्वासनाची अंमलबजावणी होते की पुन्हा आश्वासनच मिळते, याकडे बंजारा समाजाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य! प्रसाद लाड यांच्या हस्ते घेतलं पाणी, सलाईनही घेणार

Bidkin Bribe Case : टिपर सुरू ठेवण्यासाठी पोलिस हवालदाराची महिन्याला एक हजारांची मागणी; पोलिस हवालदारावर एसीबीच्या जाळ्यात

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SCROLL FOR NEXT