परदेशी, राजपुत समाजातर्फे
उद्या गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ४ ः येथील परदेशी, राजपूत समाज उन्नती मंडळाची आमसभा जावळे (ता. चाळीसगाव) येथे रविवारी (ता. ६) दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी गुणवंतांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ अध्यक्षस्थानी राहतील. जावळे येथील मंगल कार्यालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजनाबाबत चर्चा करुन अजेंड्यावरील विषयांवर चर्चा केली जाणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या समाजातील विद्यार्थ्यांसह शासनाच्या विविध परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्यांच गौरव केला जाणार आहे. त्यासाठी संबंधितांनी आपली सर्व माहिती डाॅ. के. एस. परदेशी, लक्ष्मीनगर, चाळीसगाव यांच्याकडे पाठवावी. समाजबांधवांना आमसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन परदेशी, राजपूत समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष भरतसिंग छानवाळ, कार्याध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग परदेशी, उपाध्यक्ष मथुराबाई लोदवाळ, खजिनदार डाॅ. जयसिंग परदेशी, संचालक सुभाष महाजन, ॲड. हिरालाल परदेशी, भगवान परदेशी, अशोक परदेशी, संचालिका डाॅ. सुशीला परदेशी, सचिव नीलेश परदेशी व संचालक मंडळाने केले आहे. दरम्यान, समाजाच्या मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी समाजबांधवांनी आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन परदेशी, राजपूत समाज उन्नती मंडळाने केले आहे.
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.