नाशिक

ब्राम्हणशेवगे शिवारातील विजेचा लपंडाव.. शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांना त्रस्त..

CD
ब्राह्मणशेवगे शिवारातील शेतकरी विजेच्या समस्येने त्रस्त सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ६ ः ब्राह्मणशेवगे (ता. चाळीसगाव) शिवारातील गेल्या महिन्यापासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरु आहे. १ सप्टेंबरपासून वीज वितरण कंपनीने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, सकाळी ५ ते दुपारी १२ पर्यंत वीजपुरवठा राहील असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात एकही दिवस वीज पुरवठा सुरळीत नसतो. दिवसातून केवळ चारच तास वीज पुरवठा होत असल्याने व अधूनमधून वीज ये जा करीत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. एकीकडे वरुणराजाने दडी मारुन जवळपास महिना उलटला आहे. पिकांना पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. दुसरीकडे विजेचा लपंडाव शेतकऱ्यांच्या मुळाशी उठला आहे. पाऊस गायब झाल्याने पिके करपून सुकत आहेत. शेत शिवारातील बहुतांश ट्रान्सफार्मरवर ‘डिओ’सह कटाऊट धोकेदायक झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी फ्यूज अथवा ‘डिओ’ गेल्यावर वीज कर्मचारी येतच नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव हे धोकेदायक काम शेतकऱ्यांना करावे लागते. फ्यूज व ‘डिओ’ टाकताना अथवा काढताना कोणतेही सुरक्षा साधने नसतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका असतो. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे सांगितले तर संबंधित वीज कर्मचारी, अधिकारी सहकार्य करण्याऐवजी उलट उद्धटपणे बोलतात. त्यामुळे सर्व बाजूने शेतकरी नाडला जात आहे. वीज वितरण कंपनीने दखल घेऊन शासनाने जाहीर केलेल्या कालावधीनुसार तरी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या संदर्भात गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग पत्करु, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. ---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT