नाशिक

अशोक वाबळेंच्या कवितेत खान्देशी मातीचा सुगंध गीतकार-बाबासाहेब सौदागर यांचे प्रतिपादन.

CD
CSG26B02857 चाळीसगाव ः कवी प्रा. अशोक वाबळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना गीतकार बाबासाहेब सौदागर, प्रा. डाॅ. सदाशिव सूर्यवंशी, प्राचार्य तानसेन जगताप व मान्यवर. ‘अवतीभवतीच्या कविता’चे प्रकाशन चाळीसगावला आयोजन; कवी प्रा. वाबळे यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ११ ः येथील कवी प्रा. अशोक वाबळे यांच्या ‘अवतीभवतीच्या कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाळीसगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप अध्यक्षस्थानी होते. येथील वाणी मंगल कार्यालयात सिनेगीतकार तथा निसर्ग कवी बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर) यांच्याहस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. मंचावर कवी प्रा. अशोक वाबळे, आशा वाबळे, प्रदीप देशमुख, वसंतराव चंद्रात्रे, किसनराव जोर्वेकर, उत्तमराव काळे, विश्वास देशपांडे, प्रदीप पवार, गणेश आढाव विराजमान होते. आज कवितेचे उदंड पीक आलेले असताना ग्रामीण संस्कृती आणि अवतीभवतीच्या निरिक्षणाने बहरलेल्या अशोक वाबळेंच्या कवितेत खानदेशी मातीचा सुगंध ठासून भरला असल्याची भावना कवी बाबासाहेब सौदागर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी ‘तलाश’ या हिंदी काव्यसंग्रहाचे प्रकाशन धुळे येथील कवी डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. कवी वाबळे यांनी ‘मसाप’ परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कवी मनोहर आंधळे यांनी स्वलिखित ‘मसाप’ गीत गायन केले. आशा वाबळे यांनी प्रास्ताविक केले. वंदना रोकडे व सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन तर वैशाली जगताप यांनी आभार मानले. सेवानिवृत्त प्राचार्य पी. एस. चव्हाण, शालिग्राम निकम, आर. सी. पाटील, प्रमोद पाटील, डॉ. विशाल वाबळे, डॉ. अपेक्षा वाबळे, अनिल जगताप, दिनेश चव्हाण, लिलावती जगताप, कविता सौदागर, शिवाजी साळुंके, एम. बी. पाटील, भिकन वाणी, सुधीर पाटील, अण्णा धुमाळ आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी रामचंद्र गोसावी, अशोक ब्राह्मणकार, विजय कदम, मधुकर कासार, बाळासाहेब वाबळे, प्रतिभा बागूल, गौतमकुमार निकम आदींचे सहकार्य लाभले. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT