नाशिक

चाळीसगाव बस स्थानकात दोन महिलांचे मंगळसुत्र चोरी

CD
चाळीसगाव बस स्थानकात महिलांचे मंगळसूत्र लंपास सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ९ ः येथील बस स्थानकावर बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एकाचवेळी दोन महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. ८) घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोनाली संदीप पाटील (रा. गोंडगाव, ता. भडगाव) ही महिला मुलाची तब्येत बरी नसल्याने मुलाला घेऊन चाळीसगाव येथे दवाखान्यात आलेली होती. मुलाला डॉक्टराकडे तपासून पुन्हा त्या गावाकडे जाण्यासाठी दुपारी पावणेबाराच्या समारास येथील बस स्थानकात आल्या. बसमध्ये चढल्यावर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडओरड केली असता, बसमधील इतर महिलांनी देखील गळ्यातील तपासून पाहिले असता रेखा शामसिंग पाटील (रा. छत्रपती संभाजीनगर) या महिलेची देखील गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे लक्षात आले. दोन्ही महिलांनी लगेचच पोलिस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन मोनाली पाटील यांच्या गळ्यातील १० हजार रूपये किमतीची ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व रेखा पाटील यांच्या गळ्यातील ५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र असा सुमारे १५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मोनाली पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : ‘एकनाथ शिंदे शहाणे व्हा’; मनोज जरांगेंचा संताप, उदय सामंतांनाही सुनावलं !

Kisan Rail: किसान रेल नावालाच! शेतमालासाठी ३१ टक्केच वापर, व्यापारी वाहतुकीला प्राधान्य

स्वानंदी आई होणार? मल्लिका काकूचा नवा डाव, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये नवा ट्विस्ट; प्रेक्षक मात्र खुश,म्हणतात-

Indian Army Success Story: 5 वर्षांतच राष्ट्रपतींच्या ADCपदी नियुक्ती! पहिली महिला आर्मी ऑफिसर ठरलेल्या मेजर नव्या शेखावत कोण?

आजोबांच्या जमिनीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलांविरोधात याचिका दाखल केलेल्या मुलाला हायकोर्टाने फटकारलं

SCROLL FOR NEXT