विजय दगडे व लक्ष्मण चारोस्कर
DNR26B13978
१६-१
रस्त्यावरील खड्ड्यांनी
घेतला तरूणाचा बळी
दिंडोरी ः लखमापूर- भनवड रस्त्यावरील खड्ड्यामुळे खेडले येथील लक्ष्मण सुरेश चारोस्कर (२३) हा दुचाकीने जात असताना खेडले फाटा मोरीवर दुचाकी आदळली. लक्ष्मण चारोस्कर खाली पडल्याने त्याच्या डोक्याला व नाकाला मार लागला. त्याला तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वलखेडचे सरपंच विनायक शिंदे यांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले. लक्ष्मण चारोस्कर हा अविवाहित होता.दुसऱ्या एका घटनेत इंदोरे- रासेगाव रस्त्यावर दोन दुचकींची धडकेत मनोली (ता. नाशिक) येथील विजय विष्णू दगडे (४४) यांचा छातीला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. विजय यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी, आई -वडील असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.