नाशिक

जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन शासन निधी उपलब्ध असतानाही लांबणीवर शिक्षकांमध्ये प्रचंड संताप.

CD
चांदवडच्या चुकीचा भुर्दंड उर्वरित शिक्षकांना का? ------------- निधी उपलब्ध असताना एप्रिलच्या वेतनास विलंब ः शिक्षकांत नाराजी ------------- सकाळ वृत्तसेवा दिंडोरी, ता.१५: चांदवड तालुक्यातील काही शाळांच्या वेतनबिलांमध्ये त्रुटी आढळून आल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन रोखून धरण्यात आल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. जिल्हा परिषदेमध्ये शासनाकडून निधी उपलब्ध असतानाही चांदवड तालुक्यातील शिक्षकांच्या पगाराची बिले चुकीची सादर झाल्यामुळे जिल्हाभरातील शिक्षकांचे वेतन रखडले आहे. ------------- नियमाप्रमाणे मुख्याध्यापकांनी तयार केलेली वेतन बिले गटशिक्षणाधिकारी अर्थात डीडीओ-२ यांच्या स्तरावर तपासली जाणे आवश्यक असते. मात्र चांदवड तालुक्यात संबंधित स्तरावर कोणतीही सखोल तपासणी न करता बिले ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याचा आरोप शिक्षक परिषदेकडून करण्यात आला आहे. परिणामी गंभीर प्रशासकीय त्रुटी निर्माण होऊन शिक्षकांचे पगार रखडल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाभरातील बारा हजारांहून अधिक शिक्षकांना याचा फटका बसत असून, उशिरा होणाऱ्या वेतनामुळे शिक्षकांना मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. गृहकर्ज, वाहनकर्ज, पतसंस्था तसेच विविध बँकांचे ईसीएस हप्ते वेळेवर न भरल्यामुळे अनेकांचे व्यवहार थकीत राहत आहेत. वारंवार ईसीएस बाऊन्स झाल्यामुळे शिक्षकांच्या आर्थिक विश्वासार्हतेवर परिणाम होत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. -------------- कोट चांदवडला मुख्याध्यापकांच्या स्तरावर झालेली चूक डीडीओ-२ स्तरावर दुरुस्त होणे अपेक्षित असताना, संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक तपासणी न झाल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यामुळे सर्वांचेच वेतन रोखून धरणे चुकीचे आहे. त्यात त्वरित दुरुस्ती करावी. - संजय पगार, राज्य कार्यवाह / सरचिटणीस, राज्य शिक्षक परिषद

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

कल्याण-डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात मोठी झेप! अत्याधुनिक ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार, केडीएमसीचा निर्णय

Pune News : थकीत पगारामुळे सिंहगड संस्थेतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेत संपविले जीवन; संस्थेविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT