फोटो- 14096
विजेच्या धक्क्याने
तरुणाचा मृत्यू
दिंडोरी ः तालुक्यातील मडकीजांब येथे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला. सोमवारी (ता. २२) सायंकाळी पावसामुळे येथे ओल निर्माण झाली होती. गायकवाड वस्तीलगत राहणाऱ्या भूषण संतोष गायकवाड (वय २२) याला मंगळवारी (ता. २३) सकाळी विजेचा धक्का बसल्याने तो जागीच कोसळला. त्याला दिंडोरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
भूषण दिंडोरी येथील फायनान्स कंपनीत कामाला होता. भूषणला दोन भाऊ असून, वडील मजुरीचे काम करतात, तर आई आशासेविका आहे. वीज कंपनीच्या हलगर्जीमुळे भूषणचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.