--------------------
जनतेचा आधारवड बना ः मिर्लेकर
--------------
दिंडोरी तालुका शिवसेना आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना आवाहन
--------------
सकाळ वृत्तसेवा
दिंडोरी, ता.१ : दिंडोरी तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, बुथनिहाय संघटन मजबूत करावे, मतदार यादींवर बारकाईने काम करा. लोकांना आधार वाटेल असे कामे करत लोकांचा आधारवड बना असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी येथे केले. दिंडोरी येथे शासकीय विश्रामगृहावर झालेल्या आढावा बैठकी ते बोलत होते. उपनेते दत्ता गायकवाड, लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, राजू पाटील, जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, विधानसभा संपर्कप्रमुख सतीश क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, जयराम डोखळे, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, डॉ. विलास देशमुख, उल्हास बोरस्ते, संतोष वाघ, वसंत घडवजे, उपतालुकाप्रमुख रावसाहेब जाधव आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर यांनी परिस्थिती प्रतिकूल असली तरी न डगमगता कार्यरत राहिले पाहिजे. आपल्याला शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. निष्ठा हाच शिवसेनेचा श्वास व ताकद आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा, येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल. जयंत दिंडे यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन केले. बेईमानी करून स्वार्थासाठी पक्ष सोडून गेलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे सांगितले. तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख यांनी आभार मानले.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.