CJP Delhi Protest on September 5
esakal
दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक आश्वासन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने ५ सप्टेंबरला होणारा मोर्चा मागे घेतल्याचं जाहीर केलं. कॉकरोच जनता पार्टीकडून सांगण्यात आलं की, केंद्र सरकारकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला. सुप्रीम कोर्टाने कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करत आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल करण्यात आलेले एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.