नाशिक

दोंडाईचा. अखेर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सोनशेलू बससेवा सुरू

CD
DO126B04177 दोंडाईचा : बस सुरू झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना विद्यार्थी व ग्रामस्थ. शेजारी आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी. ---------- सोनशेलू बसफेरीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा भाजपच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून स्वागत सकाळ वृत्तसेवा दोंडाईचा, ता. २४ : शहर व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेल्या बस सेवेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य परिवहन महामंडळाने बससेवा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सोनशेलू बसफेरी शाळेच्या विद्यार्थ्यांना सोयीनुसार सुरू करण्यात आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बस सेवा विस्कळीत झाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन यांनी लक्ष वेधून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे तातडीने निवेदन सादर केले. या मागणीची दखल घेत दोंडाईचा आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांनी त्वरित कार्यवाही करून बससेवा पूर्ववत सुरू केली. नव्या नियोजनानुसार सोनशेलू मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली. अंजनविहीरे, वरझडी आणि साहूर मार्गांवरील बसेस विद्यार्थ्यांच्या शाळा व महाविद्यालयांच्या वेळेनुसार नियमित धावणार आहेत. या निर्णयामुळे सोनशेलू, मेथी, वरझडी, देगाव, लोहगाव, कोळदे, कर्ले, रामी व खोक्राळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले. तर राणी मनुबादेवी रावल गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न वेळेत निकाली निघाल्याने शिक्षणाचा मार्ग पुन्हा सुरळीत झाल्याचे सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, आगार व्यवस्थापक मिलिंद परदेसी, मुख्याध्यापिका श्रीमती एस. एन. पाटील, बांधकाम सभापती मुकेश देवरे, आरोग्य सभापती छोटू सोनवणे, नगरसेवक कृष्णा नगराळे, संजोग रामोळे, संजय तावडे, नरेंद्र कोळी, मनोज निकम, बन्टी सोनवणे, महेंद्र कोळी, महेश नागदेव, भालचंद्र खलाणे, संदीप देवरे, शिक्षक अविनाश चौधरी, कुलदीप रावल, रोहन गिरासे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT