नाशिक

दोंडाईचा.. गणित छंद मंडळाची स्थापना

CD
DO126B04299 दोंडाईचा : नूतन विद्यालयात गणित छंद मंडळाच्या नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना गणिताचे पुस्तक भेट देताना डॉ. रवींद्र देशमुख व उपस्थित पदाधिकारी. --------- ‘गणित ग्रंथालय’, ‘गणितीय प्रयोगशाळा’ उपक्रम राबवावा डॉ. रवींद्र देशमुख : नूतन विद्यालयात गणित छंद मंडळाची स्थापना सकाळ वृत्तसेवा दोंडाईचा, ता. ३१ : विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर करून हा विषय अधिक सोपा, आनंददायी आणि कृतीशील करण्यासाठी ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित नूतन माध्यमिक विद्यालय व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात ‘गणित ग्रंथालय’ आणि ‘गणितीय प्रयोगशाळा’ हा अभिनव उपक्रम राबवावा, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा ज्ञानोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांनी केले. --------- नूतन विद्यालयात गणित छंद मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या वेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. देशमुख बोलत होते. प्राचार्य डॉ. बी. बी. पाटील, उपप्राचार्य सी. एस. पाटील, पर्यवेक्षक के. एच. वाडीले, एस. बी. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या गणित अध्ययनासाठी अभ्यासक्रम, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा या त्रि:सूत्रीवर भर दिला. वैदिक गणित, गणितातील गंमती-जमती आणि गणितीय कोडी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करता येईल. गणित हा केवळ पाठांतराचा विषय न राहता तो कृतीतून आणि प्रयोगातून शिकविल्यास विद्यार्थ्यांना अधिक सहजपणे समजेल, असे त्यांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त हार-पुष्पगुच्छ स्वीकारण्याऐवजी गणिताची पुस्तके भेट देऊन ‘गणित ग्रंथालय’ उभारणीच्या उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले. संस्थेतील प्रत्येक गणित शिक्षकाने दरमहा एक गणिताचे पुस्तक ग्रंथालयासाठी भेट द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी गणिताची पुस्तके भेट देऊन ‘गणित ग्रंथालयाचा’ प्रारंभ करण्यात आला. प्राचार्य डॉ. बी. बी. पाटील, प्रा. पी. जी. कागणे व पी. आर. देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. एन. पी. भिलाणे यांनी सूत्रसंचालन केले. ------ नूतन कार्यकारिणीत अशी अध्यक्षपदी एन. पी. भिलाणे, उपाध्यक्षपदी एस. पी. बडगुजर, सचिव एस. बी. सैंदाणे, सहसचिव स्मिता कागणे, खजिनदार एस. ए. पाटील, ग्रंथालय विकासपदी जे. आर. गिरासे, सदस्यपदी एस. टी. कागणे, पी. बी. विसपुते, जे. आर. गिरासे, एस. एस. शिरसाठ, के. ए. जोशी, व्ही. एस. पवार, पी. आर. गिरासे, एन. जी. पाटील, आर. एस. नांद्रे, सी. डी. भामरे यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Mamata Banerjee Relative Death : ममता बॅनर्जींच्या नातेवाईक महिलेचा संशयास्पद मृत्यू; पतीसोबत सुरू होता घटस्फोटाचा खटला

१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

Marathi News Live Updates : माहिममध्ये भाजप-मनसे आमनेसामने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT