(पान ४ ला ॲंकरच्या वर)
----------
जरांगे- पाटील यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ दोंडाईचात निवेदन
सकाळ वृत्तसेवा
दोंडाईचा, ता. ४ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे. तसेच, मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत दोंडाईचा सकल मराठा समाजातर्फे अपर तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार राजेंद्र घोलप यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजातील विद्यार्थी, युवक व बेरोजगारांना शिक्षण, रोजगार तसेच शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मराठा समाजाला कायदेशीर व टिकणारे आरक्षण तातडीने देण्यात यावे, आरक्षणासंदर्भातील प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये , नोकरीत आवश्यक सवलती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, युवकांना रोजगार व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक शासकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, मनोज जरांगे- पाटील यांच्या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून आंदोलनावर सकारात्मक तोडगा काढावा आदी मागण्या करण्यात आल्या.
या वेळी नगरसेवक विजय मराठे, संजय मराठे, मच्छिंद्र मराठे, अशोक मराठे, पोपट मराठे, लोटन मराठे, मनोज मराठे, भैय्या मराठे, जितेंद्र मराठे, हरेश मराठे, निलेश मराठे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.