नाशिक

दोंडाईचा.. गोवंश जातीच्या जनावरांना निर्दयीपणे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले

CD
गायी निर्दयीपणे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले सकाळ वृत्तसेवा दोंडाईचा, ता. ९ : पिक-अप वाहनातून सात गोवंश जनावरांना निर्दयीपणे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले आहे. वाहनास मदत करणाऱ्या दोन कार व गायी, असा पाच लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पाच संशयितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (ता. ८) रात्री साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास दोंडाईचा- नंदुरबार चौफुलीकडे कार (जीजे ०३, इएल ९३९०) गोवंश घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीला मदत करीत असताना दिसली. ही दोन्ही वाहन शहाद्याकडे जात होती. उड्डाणपुलाजवळ गणराज कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला स्कूटीवर (एमएच १८, एएल ५६५३) उभे असलेले किशोर ताराचंद बोधिजा (रा. सिंधी कॉलनी) यांना जनावरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपने (एमएच १८, बीजी १४९१) जोरदार धडक दिली व तिथून गाडी पळवून नेली. बह्याणे (ता. नंदुरबार) शिवारात जनावरांसह संशयित शाहरुख कुरेशी व गोलू कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोबत असलेल्या कारमधील अनोळखी दोन ते तीन व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पडून गेले. पिकअपमध्ये सात गायी कोंबून घेऊन जात होते. दरम्यान, किशोर बोधिजा यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी (ता. ९) सकाळी त्यांना डॉ. सलमान कुरेशी यांनी मृत घोषित केले. याबाबत केदार अनिल चौधरी यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलिसांत शाहरुख कुरेशी, गोलू कुरेशी (रा. तळोदा, जि. नंदुरबार) व त्यांच्यासोबत असलेले अनोळखी दोन ते तिघांवर जितेंद्र हरेशलाल बोधवाणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक इम्रान खान तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT