GHT26B05330
दौंडत (ता. इगतपुरी): येथील एका शेतात पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या.
-------------
३०-२
दौडत परिसरामध्ये बिबट्या
पिंजऱ्यात, आणखी शक्यता
-------------
ग्रामस्थ भितीच्या सावटाखाली कायम
-------------
सकाळ वृत्तसेवा
घोटी, ता.७ : दौंडत (ता. इगतपुरी) गावात पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण होते.
बिबट्याचा वावर लक्षात घेऊन वनविभागाने मागील आठवड्यात परिसरात पिंजरा लावला होता. अखेर पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या परिसरात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे बिबट्या पकडला गेला असला तरी ग्रामस्थांची चिंता पूर्णपणे दूर झालेली नाही.
वनविभागाने नागरिकांना विशेषतः शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला असून, रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये आणि बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.
बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी मात्र कायम आहे. शेतीची कामे, जनावरांची देखभाल आणि रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्यामुळे शेतकऱ्यांना सतत भीतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने परिसरात गस्त वाढवून आणखी बिबट्यांचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.