नाशिक

कुसुंबा महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

CD
HUS26B00563 कुसुंबा : महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यक्रमात उपस्थित शिक्षक. ----- झाडे वाचली तरच वसुंधरा वाचेल डॉ. पाटील : कुसुंबा महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण अभियान सकाळ वृत्तसेवा कुसुंबा, ता. १४ : पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. झाडांचे मुलांप्रमाणे संगोपन करून त्यांची काळजी घेतली पाहिजे. झाडे वाचली तर वसुंधरा वाचेल आणि वसुंधरा वाचली तर संपूर्ण जीवसृष्टी टिकून राहील, असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले. येथील श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पर्यावरण संरक्षण व संवर्धन अभियानाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल चौधरी होते. विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. प्रवीण महाले यांच्या हस्ते अभियानाचे उद्‌घाटन झाले. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. संस्थेच्या सचिव तथा अधिसभा व विद्या परिषद सदस्य प्रा. डॉ. दीपिका चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. जी. कासार, प्राचार्य प्रा. डॉ. एस. जी. बाविस्कर आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. अनिल चौधरी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. सुनील बावने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. बी. बी. गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT