नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : इगतपुरी तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे आगमन :

CD
इगतपुरी तालुक्याच्या पावसाचे आगमन ---------------- भात रोपांना मिळाली संजीवनी : पूर्व भाग मात्र प्रतिक्षेतच, पेरणीसह हंगामाच्या कामांसाठी बळीराजाची लगबग सुरू : : ~~~~~~~~~~~~ विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता.२२ : पावसाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरासह तालुक्यात वरुणराजाचे सोमवारी (ता.२२) दुपारच्या सुमारास आगमन झाले आहे. त्यामुळे भाताच्या रोपांनां संजीवनी मिळाली असून काही दिवसांपासून अपेक्षित अशा स्वरूपात आगमन झाल्यामुळे बळीराजाचा चेहरा खुलला आहे. महिनाभरापासून पावसाने माहेरघरातच सर्वत्र हुलकावणी दिली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्याचां जीव भांडयात पडून नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. इगतपुरी शहर व परिसरासह पाश्चिम पट्टयातील भावलीखुर्द, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, कारावाडी, अवळखेड, कारावाडी, घोटी, तळोशी, टाकेघोटी, बलायदुरी, त्रिंगलवाडी, बोरटेभें, टिटोली जामुंडे, गव्हांडे, पारदेवी, गिरणारे, तळेगाव, चिंचलेखैरे, खैरेवाडी तसेच इतर भागात पाऊस झाल्याने पश्चिम पट्ट्यात व मध्य भागासह दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे भात शेतीला व भाताच्या रोपांना संजीवनी मिळाल्यामुळे शेतकरी बांधावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान पावसाची अशीच कायम कृपा राहीली तर रोपांची वाढ होण्यास मदत मिळून हंगामातील भात लागवडीला वेग येण्यास मदत होणार आहे. दरम्यान इगतपुरी शहरात व पारिसरात समाधानकारक पाउस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रतीक्षा संपणार? मॉन्सून अखेर विदर्भाच्या उंबरठ्यावर, कोणत्याही क्षणी होणार आगमन; तीन दिवस येलो अलर्ट

Parth Pawar : दौंड - पुणे लोकल सुरू करा; खासदार पार्थ पवार यांची मागणी

Pune Monsoon Arrival: प्रतीक्षा संपली! पुण्यात मान्सून दाखल; पुढील चार दिवसांत कसा असेल पाऊस? हवामान विभागाची माहिती

Parner News : माहितीअधिकार कायद्यातील दुरुस्त्यांबाबत मुख्य माहिती आयुक्तांसोबत अण्णा हजारे यांची बुधवारी चर्चा; त्यानंतरच आंदोलनाची दिशा ठरणार

Pali News : ऐतिहासिक वारशाचे जतन! अवचितगडाच्या दरीतून 350 ते 400 किलोच्या 2 तोफांना काढले

SCROLL FOR NEXT