नाशिक

इगतपुरी : विजय पगारे : क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल इगतपुरीच्या पाच शिक्षकांना क्रीडा सेवा सन्मानपत्र प्रदान :

CD
फोटो : 08677 इगतपुरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शिक्षकांना क्रीडा सेवा सन्मानपत्र प्रदान देताना उपसंचालिका स्नेहल साळुंखे, ‘मविप्र’चे सभापती ॲड नितीन ठाकरे आदी. इगतपुरीच्या शिक्षकांना क्रीडा सेवा सन्मानपत्र सकाळ वृत्तसेवा इगतपुरी, ता. ६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन व उत्कृष्ट नियोजनाबद्दल तालुक्यातील पाच क्रीडाशिक्षकांना क्रीडा सेवा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. नाशिक विभागाच्या उपसंचालिका स्नेहल साळुंखे, ‘मविप्र’चे सभापती ॲड. नितीन ठाकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे, अविनाश खैरनार, राजू शिंदे, नरेंद्र छाजेड, संजय चव्हाण, अविनाश टिळे आदी उपस्थित होते. इगतपुरी तालुक्यात शालेय स्तरावर क्रीडा संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमधील क्रीडागुण विकसित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला. यात महात्मा गांधी हायस्कूलचे विजय सोनवणे, न्यू इंग्लिश स्कूल, वाघेरे येथील दगडू तेलोरे, असिमा बाल शैक्षणिक केंद्र, आवळखेडचे रिझवान शेख, ज्ञानगंगा महाविद्यालय, माणिकखांबचे भाऊसाहेब आहेर, न्यू इंग्लिश स्कूल, आहुर्लीचे अशोक उशीरे यांचा समावेश आहे. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

Vishwas Nangare Patil Kunbi Certificate : विश्वास नांगरे -पाटील यांनी कुणबी दाखल्याचा वापर केला? अंतरवालीत ओबीसी आंदोलनात दावा; वातावरण तापलं

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

९ वर्षांच्या एकटेपणानंतर अपूर्वा नेमळेकरांनी सांगितली मनातली गोष्ट; दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना म्हणाली...

SCROLL FOR NEXT