IGT26B08683
मुंबई : पदवीधर प्राथमिक आणि विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळावा याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे समवेत चर्चा करताना संघटनांचे प्रतिनिधी व अधिकारी.
३०-२
पदवीधर, विषय शिक्षकांना
पदवीधर वेतनश्रेणी द्यावी
--------
राज्य पदवीधर, शिक्षक संघटनेची मागणी
--------
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.११ ः राज्यातील सर्व पदवीधर प्राथमिक आणि विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेने शिक्षणमंत्र्यांकडे केली.
शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षक आमदार, प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त व उपसचिव तसेच शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारींच्या उपस्थितीत विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य पदवीधर,प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने पदवीधर आणि विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न ठामपणे मांडण्यात आला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पात्र पदवीधर व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा, या निर्णयाविरोधात शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची भूमिका घेऊ नये,अशी आग्रही मागणी संघटनेने केली. श्री. मांढरे यांनी पदवीधर शिक्षकांच्या बाजूने सकारात्मक अहवाल शासनाकडे सादर केला होता. तसा प्रस्तावही पाठविण्यात आला होता. मात्र, अर्थ विभागाने नकारात्मक भूमिका घेतल्यामुळे तो निर्णय प्रलंबित राहिला, ही बाबही बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आल्याचे केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य सरचिटणीस मनोज मराठे यांनी सांगितले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.