IGT26B08698
इगतपुरी : तालुक्यात गणरायाच्या आगमनासाठी सार्वजनिक मंडळाची मूर्ती नेताना भाविक. (छायाचित्र : विजय पगारे)
-----------------
ढोल ताशांचा गजरात इगतपुरीत गणरायाचे आगमन
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.१४ : मोरया- मोरया, गणपती बाप्पा मोरयाचा न थांबणारा अन अविरत, उत्साही जयघोष....जमेल त्या जागेवरून आणि जमेल त्याठिकाणावरुन मार्ग काढीत आनंदी वातावरणात इगतपुरी तालुक्यात गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच भाविक तयारी करुन बसले होते. ''पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात वाळा,'' ओंकार स्वरूपा, गजानना श्री गणराया या कानांवर पडणाऱ्या धून वातावरणाला नवा साज चढवत होत्या. त्यातच वरुणराजही खूश होऊन गणरायाच्या स्वागतासाठी सकाळपासूनच हजेरी लावून भाविकांचा उत्साह वाढवत होता.
इगतपुरी आणि घोटी शहरात सकाळपासूनच मूर्ती खरेदी आणि पूजेचे साहित्य घेण्यासाठी तालुक्यातील विविध भागातील नागरिकांसह आबालवृद्धांसह गर्दी केली होती. शहरातील तीनलकडी, सह्याद्रीनगर, शिवाजीनगर, शेंगाळवाडी, गिरणारे, बाराबंगला, स्वामी समर्थनगर, खालची पेठ, पंढरपूरवाडी व आदी भागात सकाळपासूनच गर्दी झाली होती. इगतपुरी शहरात व विविध भागात गणेश मूर्तीची स्थापना करून उत्सवाला सुरुवात केली. काही शाळा, कॉलेज विविध संस्था, शासकीय कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
इगतपुरी तालुक्यातील घोटी, देवळे, टाकेद, भावली, टाकेघोटी, मुंढेगाव, माणिकखांब, वाडीवऱ्हे व आदी भागातही मोठ्या उत्साहाच्या व मांगल्याच्या वातावरणात गणरायाचे आगमन झाले. ढोलताशांच्या निनादात व गजरात आगमन झाल्याने प्रत्येक गावात चैतन्याचे वातावरण दिसून आले.
१६-१
घोटीतही उत्साहात स्वागत
समस्त भाविकांचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या गणरायाचे घोटी शहरात विविध सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतीचे उत्साही वातावरणात स्वागत झाले. गणरायाच्या आराशीसह आकर्षक गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी घोटी बाजारपेठेत भाविकाची विक्रमी गर्दी झाली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आनंदी आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.