मुख्य अंक पान ३
-------------
सीटीईटी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर
१२ व १३ डिसेंबरला होणार राज्यभर परिक्षा
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.२० : समस्त शिक्षक व भावी शिक्षक वर्गाचे लक्ष लागून असलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.ही परीक्षा येत्या १२ आणि १३ डिसेंबरला संपूर्ण राज्यभरात घेतली जाणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रांची माहिती परीक्षेपूर्वी १५ दिवस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सीबीएसईने याबाबत माहिती दिली आहे.
ही परीक्षा ६ सप्टेंबरला घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना पुरेशी संधी देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या व्यापक हिताचा विचार करून प्रस्तावित सीटीईटीसाठी नोंदणी करू न शकलेल्या उमेदवारांना नोंदणीसाठी २५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
उमेदवारांचे परीक्षा केंद्र आणि परीक्षेची तारीख परीक्षेपूर्वी १५ दिवस तर प्रवेशपत्र परीक्षेपूर्वी दोन दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी २०२८ पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे सीटीईटी किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन आवश्यक पात्रता मिळवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या सीटीईटीशिवाय राज्यांमध्ये स्वतंत्रपणे टीईटी परीक्षाही घेतली जाते.
------------
कृपया : बातमीसोबत सीबीएसई मंडळाचा लोगो वापरणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.