सिंगल फेज कनेक्शनची
कंधाणे परिसरात मागणी
सकाळ वृत्तसेवा
कंधाणे, ता. १४ :परिसरातील आजूबाजूच्या गावांत व शिवारात सिंगल फेज वीजपुरवठा होत आहे, मात्र कंधाणे गावाच्या शिवारात अद्याप सिंगल फेज वीजपुरवठा सुरू नसल्याने या भागावर अन्याय होत आहे. वीज वितरण कंपनीने सिंगल वीजपुरवठा सुरू करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
कंधाणे परिसरात बारमाही बागायती क्षेत्र असल्याने व गावात राहून शेतात जाण्या येण्यासाठी विलंब परिणामी शेतीची कामे वेळेत होत नसल्याने जवळपास सर्वच शेतकरी कुटुंब शेतात वस्ती करून राहतात. शिवारात वीज वितरण कंपनीकडून भारनियमनानुसार रात्री व दिवसा चक्राकार पद्धतीने फक्त आठ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जातो. त्यात नेहमी तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याने शिवारात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
अंधारामुळे चोरट्यांकडून शेतकऱ्यांची वाहने, शेतीची औजारे, डाळिंब पेरू द्राक्ष शेतमालाची चोरी केली जाते. परिसरात सतत वावर असलेल्या हिंस्र बिबट्या व विषारी प्राण्यांपासून जीव मुठीत धरून राहावे लागते. इतर गावातील शिवारात सिंगल फेज वीजपुरवठा केला जातो परंतु कंधाणे गावाच्या शिवारात वीजपुरवठा सुरू नाही. त्यामुळे वीजवितरण कंपनीच्या भेदभाव व अन्यायकारक धोरणा विरोधात शेतकरी वर्गात तीव्र असंतोष आहे.
कोट
भारनियमनाच्या निर्धारित वेळेत देखील सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात राहावे लागते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत आहे. लवकर सिंगल फेज योजना कार्यान्वित करावी. अन्यथा शेतकरी कुटुंबांसह आंदोलन केले जाईल.
- प्रा अनिल पाटील तालुकाध्यक्ष बागलाण काॅंग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.