नाशिक

खामखेडा येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत जालनाच्या पथकाकडून गाव पाहणी आणि मूल्यांकन

CD
जालनाच्या पथकाकडून खामखेडा गावाची पाहणी सकाळ वृत्तसेवा खामखेडा ता. १४ : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जालना येथील पथकाकडून खामखेडा (ता. देवळा) गावाची तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्य, आदिवासी नृत्य आणि आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून पथकाचे उत्साहपूर्ण स्वागत केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यभरात १७ सप्टेंबर २०२५ ला सुरुवात झाली. खामखेडा गावाने या अभियानात सहभाग नोंदविला. अभियानात तपासणी पथकाने ग्रामपंचायतीतर्फे राबविलेल्या विविध विकासकामांना भेट देत लोकसहभागातून उभारलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. पथकाने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अभ्यासिका, पशुवैद्यकीय दवाखाना,तलाठी कार्यालयाची पाहणी केली. घरकूल योजनेत उभारलेल्या घरांना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक कामांना तसेच वृक्ष लागवड व अन्य नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेट देत कामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. पथकात जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार, देवळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी डी. पी. वाघमारे, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता जी.रा.जंजाळ, विस्तार अधिकारी व्ही. एम. नागरगोजे, अरविंद उघडे, पी. व्ही. शेरे, गिरीश पै, गणेश मोरे, अंकुश वाघ, सुदर्शन कारवाळ, देवीप्रसाद मांडवडे सहभागी होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार, उपसरपंच सुशिलाबाई शेवाळे, सदस्य श्रावण बोरसे, विमलबाई मोरे, गणेश शेवाळे, रामचंद्र बोरसे, गीताबाई अहिरे, ज्योती सोज्वळ, रेखा पवार, अंबर सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल नांदरे यांच्यासह गावातील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT