पान दोन ॲंकर
--------------
03077
खामखेडा : परिसरात ट्रॅक्टरद्वारे शेतात नांगरणी करताना शेतकरी.
खामखेड्यात खरीप पूर्वमशागतीची लगबग
वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल
सकाळ वृत्तसेवा
खामखेडा, ता. १५ :परिसरात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. कांदा काढणीनंतर साठवणूक आणि प्रतवारीच्या कामांमुळे शेतीची नांगरट काहीशी लांबणीवर पडली होती. परिणामी, शेतकरी वर्ग सध्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांनी आपल्या कामाच्या वेळापत्रकात मोठा बदल केला असून, पहाटे आणि सायंकाळच्या सत्रात कामाला पसंती दिली जात आहे.
दुपारच्या वेळी तापमानाचा पारा वाढत असल्याने शेतात काम करणे कठीण झाले आहे. कडक उन्हापासून वाचण्यासाठी शेतकरी पहाटे ४:३० ते ५ वाजेच्या सुमारास कामाला सुरुवात करत आहेत. सकाळी ९ वाजेपर्यंत नांगरणी आणि कुळवणीची कामे आटोपून शेतकरी घराकडे परतत आहेत. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ वाजेनंतर उर्वरित कामे पूर्ण केली जात आहेत. उन्हामुळे दुपारी ९ ते ४ या वेळेत शेतातील कामे जवळपास ठप्प असल्याने ग्रामीण भागात ''आचारसंहिते''सारखी शांतता पाहायला मिळते. सकाळच्या थंड वातावरणात जास्तीत जास्त कामे उरकण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
---------
मजूर टंचाईवर यांत्रिक शेतीचा पर्याय
मजुरांची कमतरता आणि वेळेची बचत लक्षात घेता, शेतकरी आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती सपाटीकरण, तण नियंत्रण आणि मशागतीची कामे करत आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, यासाठी योग्य मशागत करण्याकडे कल वाढला आहे. खरीप पेरणीसाठी रान तयार करणे, काडीकचरा वेचणे आणि खते टाकण्याची कामे सध्या जोरात सुरू आहेत.
यंदा उन्हाचा तडाखा जास्त असल्याने दुपारी शेतीत काम करणे कठीण होत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी मशागतीची कामे पूर्ण केली जात आहेत. वेळेत मशागत पूर्ण झाली तर खरीप पेरणीही वेळेत होईल."
विलास मोरे, शेतकरी, खामखेडा
खरीप हंगामासाठी ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. ही पद्धत काहीशी खर्चिक असली, तरीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकरी वर्ग यांत्रिक शेतीलाच प्राधान्य देत आहे.
ईश्वर शेवाळे, शेतकरी, खामखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.