नाशिक

महालपाटणे येथील युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

CD
गिरणा नदीपात्रात तरुणाचा बुडून मृत्यू सकाळ वृत्तसेवा देवळा, ता. १४ : महालपाटणे (ता. देवळा) येथे गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १४) दुपारी घडली. देवळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाण्याचे आवर्तन सुरू आहे. गुरुवारी (ता.१४) दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्पेश रवींद्र भंडोरे (वय १९) हा मित्रांसोबत क्रिकेट खेळून झाल्यानंतर अंघोळीसाठी नदीपात्रात उतरला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. तरुणाचा शोध घेण्यासाठी मालेगाव येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अथक प्रयत्नांनंतर कल्पेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या घटनेमुळे महालपाटणे व परिसरात शोककळा पसरली आहे. देवळा ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रात्री आठ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात कल्पेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. पोलिस उपनिरीक्षक विनय देवरे तपास करीत आहेत. KHW26B08260 फोटो - कल्पेश भंडोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dada Bhuse : मराठी न शिकविणाऱ्यांची मान्यता रद्द करू; राज्यभर तपासणी मोहीम राबविण्याची शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

Chhatrapati Sambhajinagar: झटपट श्रीमंत होण्याचा मोह; जीम ट्रेनर बनला मंगळसूत्र चोर, गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

Petrol-Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पुढे अजून इंधन स्वस्त होणार?

NASA ISRO Visit : नासा, इस्रो भेटीसाठी विद्यार्थ्यांचा कल; १९ हजार २५४ मुलांनी दिली परीक्षा

SCROLL FOR NEXT