नाशिक

विंचूर -प्रकाशा महामार्गावर रामेश्वर फाट्यानजीक झालेल्या अपघातात पती-पत्नी दाम्पत्यावर काळाचा घाला

CD
महामार्गावर काळाचा घाला; दुचाकीवरील दांपत्य ठार देवळा येथे मालवाहू गाडीची धडक सकाळ वृत्तसेवा देवळा, ता. २२ : येथील विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर आशादीप मंगल कार्यालयासमोर सोमवारी (ता. २२) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. मालवाहू गाडी व दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत हा प्रकार घडला. मृतांमध्ये बाबूलाल रमेश गरुड (वय ४६) व वैशाली बाबूलाल गरुड (४२, रा. सटाणा, ह. मु. नाशिक) यांचा समावेश आहे. देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रामेश्वर फाट्यानजीक आशादीप मंगल कार्यालयासमोर दुचाकी (एमएच ४१ बीसी ६०६३) आणि मालवाहू गाडी (एमएच १८ बीझेड २७३५) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार बाबूलाल गरुड यांचा अतिरक्तस्रावामुळे, तर वैशाली गरुड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदा पाटील, पोलिस शिपाई दिलीप सोनवणे व श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक निरीक्षक नंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 08368 देवळा : येथील विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्त मोटारसायकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

Vasai News: भयंकर! भटक्या कुत्र्यांच्या टोळीचा तरुणीवर जीवघेणा हल्ला, थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवडमधील तालेरा हॉस्पिटलमध्ये गॅस गळती,परिसरात भीतीचे वातावरण

Raj Thackeray : कोचिंग क्लास हा शिक्षणापेक्षा धंदा! कॉलेजची फी 20 हजार, क्लासची 1 लाख; राज ठाकरेंचा थेट सवाल

SCROLL FOR NEXT