नाशिक

देवळा नगरपंचायत प्रभाग १३ मधून प्रफुल्ल आहेर बिनविरोध

CD
फोटो ः 08374 देवळा : देवळा नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक प्रफुल्ल आहेर यांचे स्वागत करताना जितेंद्र आहेर, सुनील आहेर, युवराज आहेर, कैलास आहेर आदी. --- पोटनिवडणुकीत प्रफुल्ल आहेर बिनविरोध सकाळ वृत्तसेवा देवळा, ता. २६ : देवळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीत प्रफुल्ल परशराम आहेर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या जागेसाठी केवळ आहेर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी त्यांना नगरसेवकपदाचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. निवडीनंतर नवनिर्वाचित नगरसेवक प्रफुल्ल आहेर यांनी शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या यशाबद्दल समर्थकांनी पाचकंदील चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार आनंदोत्सव साजरा केला. यानंतर पी. के. आप्पा आहेर पतसंस्थेच्या कार्यालयात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक जितेंद्र आहेर, खाजगी कृषी मार्केटचे सभापती सुनील आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, युवराज आहेर, पुंडलिक आहेर, किशोर खरोटे यांच्यासह देवळा परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष किशोर खरोटे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

SCROLL FOR NEXT