नाशिक

वसाका पुन्हा सुरू करण्यासाठी एनसीडीसी कार्यालयात बैठक आमदार डॉ राहुल आहेर यांनी घेतली मनोजकुमार बन्सल यांची भेट

CD
फोटो ओळ - 08614 दिल्ली ः राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या कार्यालयात ‘वसाका’ पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने संमती मिळावी, यासाठी ‘एनसीडीसी’चे उपव्यवस्थापकीय संचालक (वित्त) मनोजकुमार बन्सल यांना निवेदन देताना आमदार डॉ. राहुल आहेर आदी. ............. ‘वसाका’ पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार आहेरांचे ‘एनसीडीसी’ला निवेदन देवळा, ता. १६ : विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना अर्थात, ‘वसाका’ पुन्हा सुरू करण्यासाठीची वस्तुस्थिती व तशा आवश्यक बाबी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ‘एनसीडीसी’चे उपव्यवस्थापकीय संचालक (वित्त) मनोजकुमार बन्सल यांच्यासमोर मांडल्या. वसाका पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) कार्यालयात बुधवारी (ता. १६) त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीस एनसीडीसीचे साखर संचालक श्री. दुबासी, विधी कार्यालयाचे उपसंचालक, सहाय्यक संचालक यांच्यासह ‘वसाका’चे विधिज्ञ ॲड. विलास देशमाने उपस्थित होते. बैठकीत वसाका सुरू करण्याच्या दृष्टीने कायदेशीर, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. वसाका कारखाना मोठ्या आर्थिक कर्जामुळे आणि कायदेशीर लिलावाच्या प्रक्रियेमुळे अडचणीत सापडला असून, तो सहकार तत्त्वावर किंवा शासनाच्या मदतीने पुन्हा सुरू व्हावा, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे ‘वसाका’च्या थकीत कर्जप्रकरणाबाबतही या वेळी चर्चा झाली. कारखान्यावरील थकीत देणी मिटवण्यासाठी आणि खेळते भांडवल मिळवण्यासाठी ‘एनसीडीसी’कडून आर्थिक पॅकेज मंजूर करून घेणे हाही बैठकीचा हेतू आहे. या बैठकीतून कारखान्याला शासनाची थकहमी मिळून कर्ज मंजूर झाल्यास सभासद शेतकऱ्यांना आणि कामगारांना दिलासा मिळणार आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर ‘एनसीडीसी’ कार्यालयात झालेल्या बैठकीत ‘वसाका’ पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक संमती मिळावी, यासाठीचे निवेदनही बन्सल यांना देण्यात आले. ............. कोट वसाका पुन्हा सुरू व्हावा, शेतकरी आणि कामगारांच्या हिताला बळ मिळावे आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. डॉ. राहुल आहेर, आमदार .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT