नाशिक

कळवणमध्ये आंतरराज्यीय सट्टा रॅकेट उद्ध्वस्त

CD
फोटो ः 09138 कळवण ः येथे सायबर गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयितांसह हस्तगत केलेले साहित्य. --- कळवणमध्ये आंतरराज्यीय सट्टा रॅकेट उद्ध्वस्त पाच संशयित गजाआड; लॅपटॉपसह ५४ बँकांचे पासबुक, २५ एटीएम कार्ड हस्तगत सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. २६ : शहरातील फुलामाता चौकातील गंगा निवास येथे सुरू असलेल्या ऑनलाईन सट्टा सेंटरवर नाशिक सायबर क्राईम विभागाने गुरुवारी (ता. २५) रात्री धडक कारवाई केली. एका केबल ऑपरेटरच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरून चालणाऱ्या या आंतरराज्यीय ऑनलाईन गेमिंग रॅकेटचा पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून आॅनलाईन साहित्यासह चेकबुक, पासबूक, एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले आहे. -- सायबर क्राईम पथकाने केलेल्या या कारवाईत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात अरबाज शब्बीर शेख (वय २७, रा. देवळाली), आसिफ जाफर हुसेन (वय ४२, रा. लासलगाव), पठाण अरबाज खान फरीद खान (वय २३, रा. गुजरात), पंकज नामदेव आहेर (वय ३४, रा. नाशिक) आणि सागर रमेश कांबळे (वय ३८, रा. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. हे संशयित लॅपटॉप व मोबाईलच्या साहाय्याने विविध वेबसाईट्सद्वारे ऑनलाईन सट्टा चालवत होते. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिस ठाण्यात ऑनलाईन गेमिंग प्रचार आणि नियमन कायद्यासह माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, सहाय्यक निरीक्षक धीरज गवारे, साहिल सय्यद, दर्शन सोनवणे, भूषण देशमुख व पथकाने केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे पुढील तपास करीत आहेत. --- पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुद्देमाल छाप्यादरम्यान पोलिसांंनी आरोपींकडून ४ लॅपटॉप, १८ मोबाईल, ३ राउटर, विविध बँकांचे ५४ पासबुक, ४ चेकबुक, २५ एटीएम कार्ड्स, २६ सिमकार्ड्स आणि हिशोबाच्या चार वह्या असा मोठा मुद्देमाल जप्त करून सीलबंद केला आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

Pune University QS ranking drop: राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे विद्यापीठाच्या क्यूएस मानांकनात मोठी घसरण; युवक काँग्रेसचा सरकारवर आरोप

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

SCROLL FOR NEXT