नाशिक

विसापूरसह 5 आश्रमशाळांमधील 34 विद्यार्थी उपजिल्हा रुग्णालयात दाखल

CD
एकीचा मृत्यू... ३४ जण रुग्णालयात! विसापूरसह पाच आश्रमशाळांमधील ३४ विद्यार्थी रुग्णालयात दाखल सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. ५ : तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विसापूर येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आश्रमशाळांमध्ये आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली असून, विविध आश्रमशाळांमधील तब्बल ३४ विद्यार्थ्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप, सर्दी, उलटी तसेच व्हायरल संसर्गाची लक्षणे आढळल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शासकीय आश्रमशाळा विसापूर येथील सर्वाधिक २५ विद्यार्थी आहेत. याशिवाय नवी बेज आश्रमशाळेतील पाच, साल्हेर येथील एक, मानूर येथील दोन आणि काठरेदिगर येथील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. विसापूर येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतही गंभीर चिंता व्यक्त होत असून, प्रशासनाने तपासणी आणि उपचारांची मोहीम अधिक तीव्र केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली असून, आवश्यक उपचार सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय बंगाळ, बालरोगतज्ज्ञ डॉ. जनक पूरकर यांच्यासह वैद्यकीय पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विसापूर येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर एकाच वेळी विविध आश्रमशाळांमधील ३४ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने आदिवासी व दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा गंभीरपणे समोर आला आहे. चौकट रुग्णालयात दाखल ३४ विद्यार्थी पंकज नानाजी पवार (१०), कार्तिक सुदाम पवार (७), यामिनी अमोल खैरनार (१०), अनुष्का संजय गावित (८), तुषार नामदेव पवार (११), वैष्णवी सुनील पवार (१५), ललिता नारायण गावित (१४), मनीषा धनराज पवार (१२), प्रीती धर्मा चौरे (१४), प्रीती श्रावण पवार (१९), लक्ष्मी सुनील बर्डे (१३), जया वसंत बहिरम (१२), दुर्गा बाळू पवार (१२), गंगोत्री कृष्णा पवार (८), सारा सोना बर्डे (१४), सोनाली भूषण जगताप (१३), कार्तिक रामदास बर्डे (१२), जयश्री बाळू गांगुर्डे (१५), जयेश गुलाब बागूल (७), आरोही प्रदीप पवार (६), राकेश भिला पवार (७), चैतन्य शंकर पवार (११), भारत उलुषा माळी (९), रोहिणी नारायण गावित (१५), कृष्णा यशवंत बर्डे (१०), हेमराज युवराज सोनवणे (१०), अर्चना सोमनाथ सोनवणे (८), कृष्णा रमेश सोनवणे (१०), अमोल सोनू बर्डे (८), चेतन कृष्णा माळी (१४), ललित किसन बागूल (१५), मंगेश सोमनाथ बर्डे (१३), विक्रम नाना पवार (१३) आणि विशाल विश्वास वाघ (१२). KLW26B09463 कळवण : उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेली विद्यार्थी- विद्यार्थिनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

Accident : थेऊर फाटा येथे ट्रक अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू; रक्षाबंधन उरकू‌न घरी जाताना झाला होता अपघात

IND vs PAK Asia Cup: भारताची विजयी हॅटट्रिक! ९ षटकांत जिंकली मॅच, पाकिस्तानची इतकी वाईट अवस्था कधी झालीच नव्हती

Pune Dahihandi : दहीहंडीत डीजेचा आवाज ९० डेसिबलपर्यंत; नियमांची मर्यादा ओलांडली

डीजेवर नाचतानाचा VIDEO व्हायरल; विद्यानंद बापट म्हणाले, ‘बघणाऱ्यांची कीव येते’

SCROLL FOR NEXT