मेन
‘श्रीकृष्ण लीला’ पाहण्यासाठी भाविकांचा जनसागर
श्रीकृष्ण गणेश मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी देखाव्याला जिल्हाभरातून प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कळवण : श्रीकृष्ण गणेश मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेल्या भव्य ‘श्रीकृष्ण लीला’ देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देखावा पाहण्यासाठी जिल्हाभरातून गणेशभक्तांमुळे कळवणमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून जात आहे.
मंडळाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधून सुमारे अडीच एकर परिसरात देखावा उभारला आहे. पंधरा हजार चौरस फुटांच्या मंडपात ७१ आकर्षक मूर्तींच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्म, बाललीला, असुरांचा वध, रासलीला तसेच महाभारतातील भगवद्गीतेचा उपदेश यांचे दर्शन घडविले आहे.रोषणाई, प्रसंगानुरूप सजावट आणि कलात्मक रचनांमुळे देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र स्वयंसेवक पथके तैनात आहेत. प्रवेश व बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग, रांगांचे नियोजन, पिण्याचे पाणी, वाहनतळ आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. ध्वनिक्षेपकाद्वारे सूचनाही दिल्या जात आहेत. पोलिसांसह मंडळाचे पदाधिकारी व सभासद रात्री उशिरापर्यंत व्यवस्थेवर लक्ष ठेवत आहेत. अध्यक्ष उदय नावरकर, उपाध्यक्ष दीपक शेंडे, खजिनदार लक्ष्मीकांत कोठावदे, सहखजिनदार बापू पगार, सचिव अनिल कोठावदे, सहसचिव सागर अमृतकर, कार्यकारी अध्यक्ष सतीश कोठावदे, शामकांत कोठावदे, नंदकिशोर दशपुते, संदीप पगार, योगेश अमृतकर, सतीश कोठावदे, दीपक अमृतकर, हेमंत कोठावदे यांच्यासह समित्यांचे प्रमुख, पदाधिकारी व सभासद व्यवस्थेत सहभागी आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गणेशयाग तसेच धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनाही प्रतिसाद मिळत आहे.
चौकट
आनंद मेळ्यातही गर्दी
मंडळाच्या आनंद मेळ्यात विविध प्रकारची रहाटपाळणे आणि आकर्षक खाऊ गल्ली उभारली आहे. त्यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. बालगोपाळांसह गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीही गर्दी होत आहे.
कोट
“मंडळाच्या ५० वर्षांच्या वाटचालीत कळवणकरांसह जिल्ह्यातील नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘श्रीकृष्ण लीला’ देखाव्याला मिळणारा प्रतिसाद आनंददायी आहे. भाविकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात दर्शन घेता यावे, यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद प्रयत्नशील आहेत.”
— उदय नावरकर, अध्यक्ष, श्रीकृष्ण गणेश मित्र मंडळ
कळवण : ‘श्रीकृष्ण लीला’ देखावा पाहण्यासाठी झालेली गणेशभक्तांची अलोट गर्दी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.