नाशिक

कापडणे कांदा लागवड

CD
(पान ४ ला ॲंकर) ---------- KPD26B13266 सैताळे : त्र्यंबक वाघ यांच्या शेतात कांद्याची लावणी करतांना महिला मजूर. --------- पावसाळी कांदा लावणीला वेग; शेतकऱ्यांचा कल वाढला रोप मुबलक उपलब्ध; अस्थिरता झुगारून लागवडीकडे शेतकऱ्यांची धाव सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. ३० : खानदेशात धुळे जिल्हा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, भाव मिळो अथवा न मिळो कांदा लागवडीचे क्षेत्र कायम राहते. कांदा उत्पादनाची आवड आणि अनुभव असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे. सध्या श्रावणातील पावसाळी कांदा लावणीला वेग आला असून, पावसाचा काहीसा विलंब आणि कांद्याच्या भावातील अस्थिरता असतानाही शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल कायम आहे. रोपांची उपलब्धता मुबलक असली, तरी लागवडीची मागणी वाढल्याने काही अंशी रोपांच्या दरात वाढ झाली आहे. ---- धुळे जिल्ह्यात धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यांत कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यात धुळे आणि साक्री तालुक्यांत पावसाळी कांद्यासाठी मोठे क्षेत्र राखून ठेवले जाते. यंदा साक्री तालुक्यातील बहुतांश प्रकल्प व धरणे भरली असून पाटचाऱ्यांमधून पाणी वाहत आहे. नदी-नालेही खळाळले असून, विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीच्या कामाला वेग दिला आहे. धुळे तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाला असला, तरी काही भागांत विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी अपेक्षेइतकी वाढलेली नाही. उपलब्ध पाण्याचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली आहे. कापडणे, सोनगीर, सायणे, नंदाणे, बुरझड, बोरीस, लामकानी, नेर, कुसुंबा आणि आनंदखेडे हा परिसर कांदा उत्पादनाचा प्रमुख पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी कमी पाण्यातही नियोजनबद्ध पद्धतीने अधिक उत्पादन घेण्यासाठी परिचित आहेत. ठिबक सिंचन, गादी वाफ्याचा वापर पारंपरिक पद्धतीबरोबरच शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करू लागले आहेत. ठिबक सिंचन आणि गादी वाफा पद्धतीचा अवलंब करून कांद्याचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. रोपांच्या मागणीत वाढ श्रावणातील कांद्याची लागवड फायदेशीर ठरते आणि उत्पादनही चांगले मिळते, असा अनुभवी शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याने कांदा रोपांची मागणीही वाढली आहे. एक एकर क्षेत्रासाठी साधारण तीन ते चार हजार रुपयांचे रोप लागते. काही शेतकरी स्वतः रोपवाटिका तयार करून रोपांची विक्री करीत असून, त्यातून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. -------- कोट पाच पिढ्यांपासून कांद्याचे उत्पादन घेत आहोत. भाव अभावी कांदा फेकलाही जातो. कर्जबाजारी होण्याची भिती नाही. कांद्याची पारंपारीकच लावणी करून उत्पादन घेत असतो. - त्र्यंबक वाघ, कांदा उत्पादक, सैताळे ---- कांद्याला हमी भावाऐवजी उत्पादन खर्चावर भाव असावा. तरच कांदा परवडेल. यावर्षी कांद्याकडे अधिक कल वाढला आहे. - राजा पाटील, कांदा उत्पादक, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT