नाशिक

लळींग ट्रान्सफाॅर्मर मागणी

CD
KPD26B13271 लळींग : रोहित्र देण्याच्या मागणीचे निवेदन देताना ग्रामस्थ. --------- लळींगला हवे दुप्पट क्षमतेचे रोहित्र आमदार राम भदाणे यांना ग्रामस्थांचे निवेदन सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. १ : लळींग (ता. धुळे) येथील वीजपुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. येथे केवळ एकच शंभर केव्ही क्षमतेचे रोहित्र आहे. त्यामुळे दुप्पट क्षमतेचे विद्युत रोहित्र मंजूर करावे, अशी मागणी लळींग येथील ग्रामस्थांनी आमदार राम भदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, की येथील वीजपुरवठा मागील अनेक वर्षांपासून केवळ १०० के.व्ही. क्षमतेच्या रोहित्रावर अवलंबून आहे. गावाची लोकसंख्या आणि वीज वापर वाढल्याने या रोहित्रावर अतिरिक्त भार पडत आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. लळींगचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा आणि ग्रामस्थांची समस्या कायमस्वरूपी निकाली निघावी, यासाठी तत्काळ दोनशे के.व्ही.चे नवीन विद्युत रोहित्र उपलब्ध करून देण्याचा आग्रह निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर धिरज परदेशी, निलेश जगदाळे, मनोज बळसाणे, निलेश कुलकर्णी, हितेश परदेशी, नंदू बळसाणे, आदेश सावंत, किरण परदेशी, ऋषिकेश वाघ, गंगाराम बारसे, अशोक चव्हाण, राहुल पवार, रोशन परदेशी, विजय ठाकरे, रोहित सोनवणे, राजेश सावंत, गीतंम परदेशी, मयूर वाघ, दीपक सोनवणे, सखाराम गवळी, निलेश महाले आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishnaraj Mahadik Amit Thackeray : कृष्णराज महाडिकांनी पोलिसांचा डोळा चुकवला पण; अमित ठाकरेंवर जोरदार टीका, मुंबईत भाजप -मनसेमध्ये नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, मराठा आंदोलकांकडून शोले स्टाईल आंदोलन

Diet Tips: ट्रेकिंग करताना काजू-बदाम खाताय? हाय अल्टीट्यूडवर ड्रायफ्रूट्स खाणे धोकादायक! वाचा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

Retirement Planning: 60 नाही, 43 व्या वर्षीच रिटायरमेंट! 85 लाखांचा फंड अन् 39 हजार भाडे, कपलचा प्लॅन नेमका काय?

का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

SCROLL FOR NEXT