धुळ्यात उद्या शेतकरी परिसंवाद
शरद जोशी जयंती सप्ताह; उपस्थितीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १ : शेतकरी संघटना धुळे व नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संघटणेचे प्रणेते शरद जोशी यांच्या जयंती सप्ताहानिमित्त येत्या गुरुवारी (ता. ४) सकाळी दहाला धुळे शहरातील गोंदूर विमानतळ रस्त्यावरील दत्त मंदिराजवळील सौभाग्य मंगल कार्यालयात भव्य शेतकरी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
‘भिक नको, घेऊ घामाचे दाम’ या प्रेरणादायी घोषवाक्यासह होणाऱ्या या परिसंवादासाठी शेती आणि शेतकरी चळवळीतील दिग्गज व्यक्तिमत्वे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे हे ‘शेतकरी संघटना व भविष्यातील शेती तंत्रज्ञान धोरण’ या विषयावर मार्गदर्शन करतील. ऑल इंडिया किसान कॉर्डिनेशन कमिटीचे जनरल सेक्रेटरी गुणवंतराव हंगरगेकर हे बाजार व्यवस्थापन, शेतीमाल प्रक्रिया व मूल्यवृद्धी याबाबत शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला देतील. जैन इरिगेशन जळगावचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे हे कापूस व मका उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर आधुनिक शेतीचे धडे देणार आहेत.
कापूस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच बाजारपेठेतील आव्हानांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा परिसंवाद अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तरी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.