KPD26B13283
धनूर : लोकसहभागातून रस्त्याची दुरूस्ती करताना.
-----------
धनूर- डोंगरगाव रस्त्याची दुरुस्ती
लोकसहभागातून विकासाचा आदर्श
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ४ : धनूर (ता. धुळे) येथे सार्वजनिक कामासाठी शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून गावाचा विकास साधता येतो, याचा आदर्श धनूर येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. त्यांनी पुर्णतः दुरावस्था झालेल्या धनूर ते डोंगरगाव रस्त्याची लोकसहभाग, श्रमदान आणि यंत्रसामुग्रीच्या मदतीने दुरूस्ती केली आहे.
धनूर ते डोंगरगाव (ता. धुळे) रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी व शेतमाल वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागत होती. स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या ग्रामसभेत सरपंच चेतन शिंदे यांनी ही समस्या मांडली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत नवनिर्वाचित तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या जेसीबीच्या साहाय्याने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या मदतीने रस्त्यावर मुरूम टाकून दुरुस्तीचे काम पूर्ण केले. यासाठी माजी उपसरपंच शिवाजी गुजर, साहेबराव बापू कोळी, कैलास पाटील, दीपक पाटील, भटू पाटील, विजय पटेल व गोलू पाटील यांनी ट्रॅक्टरचे सहकार्य केले.
दरम्यान, लोकसहभागामुळे रस्ता वाहतुकीस सुकर झाला असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरपंच चेतन शिंदे, उपसरपंच शरद शिंदे, अधिकारी शरद ठाकरे व ग्रामस्थांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.