नाशिक

वीस महिन्यात १५५ ट्रान्सफार्मरची व्यवस्था

CD
KPD26B13289 खंडलाय : रोहीत्र जळाल्यानंतर चोवीस तासांच्या आत नव्याने बसविले जात आहे. ------- वीस महिन्यात १५५ रोहित्रांची व्यवस्था आमदार राम भदाणे : धुळे तालुक्यात विजेची समस्या निघतेय निकाली सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. ३ : धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची वीजेची समस्या तत्काळ निकाली काढण्यासाठी पूर्णतः प्रयत्न सुरू आहेत. केवळ वीस महिन्यांच्या कार्यकाळात १५५ पेक्षा अधिक रोहित्र बसवून शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील काळात शंभर टक्के विजेची समस्या निकाली निघालेली असेल, असे आमदार राम भदाणे यांनी सांगितले. खंडलाय (ता. धुळे) येथे चोवीस तासात जळालेले रोहित्र नव्याने बसविण्यात आले. त्यासंदर्भात आमदार भदाणे बोलत होते. त्यांनी तालुक्यात बसविण्यात आलेल्या रोहित्रांची माहिती दिली. नव्वद गावांमध्ये जळालेले रोहित्र नव्याने बसविले आहेत. यामध्ये देऊर, नंदाळे, विश्वनाथ, शिरडाणे प्र.नेर, सुकवड, मोघन, चिंचखेडे, बोरीस, लोणखेडी, चिंचवड, न्याहळोद, जुनवणे, देवभाने, कापडणे, सोनेवाडी, पुरमेपाडा, अनकवाडी, रामी, वणी खुर्द, मेहरगाव, अजनाळे, विसरणे, वार, निमडाळे, अजंग तांडा, कुंडाणे, सायने, लामकानी, कौठळ, आर्वी, काळखेडे, वडणे, खंडलाय, चिंचवार, नावरा- नावरी, विंचूर, उडाणे, निमगूळ, आंबोळे, धनुर, नरव्हाड, अंबोडे, सिताणे या गावांचा समावेश आहे. गाव व शिवारांमध्ये ६३ केव्ही क्षमतेच्या रोहित्रावर अधिकचा दाब असल्याने वारंवार रोहित्र जळत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार भदाणे यांनी २५ हून अधिक ठिकाणी ६३ केव्हीचे रोहित्र काढून १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र बसवले आहे. लामकानी, धनूर, विश्वनाथ, नरव्हाळ, न्याहळोद, सुकवड, दह्याने, देवभाने, वडणे, नेर गावठाण, नेर, कासवीर, मुकटी, मोघण, बांबुर्ले, सुट्रेपाडा, आर्वी, बेंद्रेपाडा, निमगूळ, कुंडाणे-वार, चौगाव, कुसुंबा, शिरूड आदी ठिकाणी क्षमतावाढ करण्यात आली आहे. चाळीसपेक्षा अधिक ठिकाणी नवे रोहित्र बसविण्यात आले आहेत. यात कावठी, न्याहळोद, कापडणे- न्याहळोद, चिंचखेडे, निमगूळ, नूरनगर, महालकाळी, लामकानी, नगाव बुद्रुक, नावरा, हेंकळवाडी, वडणे, सायने, चौगाव, सोनेवाडी, शिरूड, कुसुंबा, देऊर बुद्रुक, मोघण, जुनवणे, आनंदखेडा, सुट्रेपाडा, अजंग, मुकटी, आमदड, खंडलाय, तरवाडे, बेंद्रेपाडा, अकलाड, आंबोडे, शिरडाणे, बांबुर्ले या गावांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

टिटवाळ्यातील कामामुळे आंबिवलीत प्रवासी रखडले, स्टेशन मास्टर कार्यालयात प्रवाशांनी घातला गोंधळ

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Egg Freezing & Future Fertility: आई-वडिल होण्यासाठी अंडी फ्रीज करण्याचा विचार करताय? आधी ‘या’ ४ गोष्टी समजून घ्या

SCROLL FOR NEXT